रक्तदान हे जगातील प्रमुख महादानापैकी एक आहे. याचे महत्त्व मागील कोरोना काळात आल्यामुळे त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नवा दिल्लीच्या एका युवकाने देश भ्रमंती करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेअंतर्गत किरण वर्मा नामक हा युवक तब्बल 26 हजार कि. मी.चा प्रवास करून आज बेळगावात दाखल झाला आणि त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
बेळगाव येथे दाखल झालेल्या किरण वर्मा याला प्रसिद्धीमाध्यमांनी त्याच्या मोहिमेबद्दल विचारले असता तो म्हणाला की, त्याने त्रिवेंद्रम येथून रक्तदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी या मोहिमेचा प्रारंभ केला. त्यानंतर केरळ तामिळनाडू, कन्याकुमारी, चेन्नई आदी मार्गांचा प्रवास करून तू आज बेळगाव दाखल झाला आहे. रक्तदानाचे महत्त्व विषद करण्यासाठी देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात जाऊन जनजागृती करणे हा माझ्या या मोहिमेचा उद्देश आहे, कअसेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील दोन वर्षातील कोरोना प्रादुर्भाव काळात रक्ताच्या टंचाईमुळे रुग्णांचे झालेले, काहींना आपले प्राण गमवावे लागलेले याची जेंव्हा मला जाणीव झाली तेंव्हा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून आपण रक्तदान संदर्भात काहीतरी करायला हवे असे मला वाटले आणि त्यातून प्रेरणा घेऊन मी आज देशभ्रमंतीला निघालो आहे.
गेल्या 4 महिन्यात मी 26000 कि.मी.हून अधिक अंतराचा प्रवास पायी केला आहे. या कालावधीत मी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या रक्तदान शिबिरातून 2 हजार अधिक लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे.
या व्यतिरिक्त माझ्या या मोहिमेपासून प्रेरणा घेऊन कांही लोकांनी आपल्या मूळ गावी जाऊन रक्तदान केले आहे. या पद्धतीने आतापर्यंत 3000 लोकांना मी रक्तदान करण्यास प्रेरित केले आहे अशी माहिती किरण वर्मा याने दिली.