भारत सरकारचे मुख्य माहिती आयुक्त उदय माहुरकर यांची बेळगाव live च्या वतीने संपादक प्रकाश बेळगोजी यांनी उद्योजक रमेश रायजादे समवेत आज रविवारी सकाळी सांबरा विमानतळावर सदिच्छा भेट घेतली.
भारत सरकार चे माहिती आयुक्त उदय माहुरकर हे गेले दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर होते.ते कोल्हापूरहून दिल्लीला परत जातेवेळी बेळगाव विमानतळावर बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आणि रमेश रायजादे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी केंद्रीय माहिती आयुक्त माहुरकर यांनी बेळगावातील प्रसिद्धी माध्यम आणि पत्रकारितेविषयी बेळगोजी यांच्याकडून माहिती जाणून घेऊन साधक-बाधक चर्चा केली.
सदिच्छा भेटीप्रसंगी उदय माहुरकर यांना बेळगाव भेटीचे आमंत्रण देण्यात आले. तेंव्हा सुहास्यवदनाने आमंत्रणाचा स्वीकार करत भविष्यात बेळगावात एखादा कार्यक्रम आयोजित करा, मी त्यासाठी नक्की बेळगावला येईन, असे आश्वासन माहुरकर यांनी दिले.
उदय माहुरकर हे मूळचे अहमदाबादचे असून सध्या ते भारत सरकारचे माहिती आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा प्रोटोकॉल अर्थात शिष्टाचार लागू आहे.