बेळगाव जिल्ह्यातील भाजप मध्ये असलेली उभी फुट दूर करण्याची जबाबदारी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर देण्यात आली असून जोशी बेळगाव जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी मधला वाद दूर करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत
बेळगाव शहरातील संकम हॉटेल मध्ये शनिवारी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून बेळगाव विजापूर बागलकोट यातीन जिल्ह्यातले माजी आणि विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
वायव्य पदवीधर मतदार संघाचे उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अरुण शहापूर या दोघांना निवडून आणण्यासाठी संकम हॉटेलमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे यासाठी भाजपाने प्लॅन तयार केला असून त्या बैठकीला भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे संबोधित करणार आहेत.
या बैठकीत बेळगाव जिल्ह्यातले भाजपचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होणार असून पालकमंत्री गोविंद कारजोळ हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या सर्वांची उपस्थिती मध्ये बेळगाव जिल्ह्यातली फुट दूर करण्यात प्रल्हाद जोशी यांना यश मिळते का याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव जिल्ह्यात या भाजपाच्या दोन गटांपैकी कोणते नेते बैठकीला हजेरी लावतात आणि कोणते नेते अनुपस्थित राहतात यावरून तर्क वितर्क काढले जात आहेत.
मागील विधानपरिषद निवडणुकीत भाजपा मधल्या अंतर्गत फुटी मुळेच भाजपचे अधिकृत उमेदवार महंतेश कवटगीमठ यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे या विधानपरिषद निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने दोघांचा विजयासाठी आतापासूनच कंबर कसली आहे
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी अकरा वाजता संस्थांमध्ये बैठक घेतल्यानंतर पुन्हा ते चिक्कोडी कडे दुपारी रवाना होणार आहेत.