Saturday, December 21, 2024

/

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

 belgaum

गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने धाड टाकत हीरोइन विकणाऱ्या तनवीर मेहबूब देशनूर वय 40 रविवार पेठ बेळगाव, सद्दाम अन्वर देशनूर वय वय 31 रा.गांधीनगर व मयूर हरिभाऊ भातकांडे वय 27 रा.सरस्वती नगर गणेशपूर बेळगाव यांना अटक करत कारवाई केली.

पोलिसांनी या आरोपींकडून सत्तावीस ग्रॅम वजनाच्या 85 हिरॉईनच्या पुड्या व तीन मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत जप्त केलेल्या हेरॉइनची किंमत अंदाजे 34 हजार इतकी आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडे बाजार पोलिसांची कारवाई

खडेबाजार पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकत त्यांनी विकणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे . रितेश परशराम गुंडकल वय 27 राहणार चव्हाट गल्ली बेळगाव असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्या जवळून 8 ग्रॅम 500 मिली पन्नी जप्त केली आहे त्याची किंमत 12950 इतकी आहे.पोलिसांनी त्याच्या जवळील 600 रु रोख रक्कम आणि मोबाईल फोन देखील जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.