युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खाते बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 2 ऱ्या मिनी ऑलिंपिक गेम्स -2022 मधील ज्युडो क्रीडा प्रकारात 11 सुवर्णपदकांसह एकूण 15 पदकांची कमाई करत स्पृहणीय यश संपादन केले.
क्रीडा खात्यातर्फे बेंगलोर येथे गेल्या 18 व 19 मे रोजी कर्नाटक राज्यस्तरीय दुसऱ्या मिनी ऑलिंपिक गेम्स -2022 चे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवातील ज्युडो क्रीडाप्रकारात बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी संपादन केलेले यश पुढील प्रमाणे आहे.
मुलींचा विभाग : 32 किलो वजनी गट -भूमिका बेळगावी सुवर्णपदक, 36 किलो गट -अमृता नाईक सुवर्णपदक, 40 किलो गट -श्वेता अलकनुर सुवर्णपदक, 44 किलो गट -सोनालिका सी. एस. सुवर्णपदक, 48 किलो गट -शगुफ्ता वालीकर सुवर्णपदक, 52 किलो गट -आलीया सुवर्णपदक, 57 किलो गट -आफ्रीन सुवर्णपदक, 57 किलो वरील गट -निशा कंग्राळकर कांस्यपदक.
मुलांचा विभाग : 40 किलो वजनी गट -सुरज सावंत सुवर्णपदक, 45 किलो गट -प्रीतम रौप्यपदक, 50 किलो गट -अमित कुमार रौप्य पदक, 55 किलो गट -रियाज किल्लेकर सुवर्णपदक, 60 किलो गट -अब्दुल कांस्य पदक, 66 किलो गट -इर्शाद सुवर्णपदक, 66 किलो वरील गट -आर्यन डोंगले सुवर्णपदक. या पद्धतीने बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी एकूण 11 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 2 कांस्यपदकाची कमाई केली.
उपरोक्त सर्व यशस्वी ज्युडोपटू युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या नेहरू स्टेडियम बेळगाव येथील ज्युडो सेंटरमध्ये सराव करतात. त्यांना ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल यशस्वी खेळाडूंसह प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.