Tuesday, December 24, 2024

/

बेळगाव बंटर संघाचा 8 रोजी वर्धापन दिन

 belgaum

बंटर उर्फ नाडवर संघ बेळगावचा 38 वा वर्धापन दिन येत्या रविवार दि. 8 मे रोजी दुपारी 4 वाजता शहराती बंटर भवन येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी दिली.

उद्यमबाग येथील राघवेंद्र रेस्टॉरंट अँड लंच होम येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव बंटर संघाचा 38 वा वर्धापन दिन येत्या रविवारी साजरा केला जाणार आहे.

सदर सोहळ्याचे अध्यक्षस्थान बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह उडपी जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तल्लूर शिवराम शेट्टी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्नाटक प्रदेश हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष जी. के. शेट्टी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने यक्षगान राग वैभव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर बंटर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजातील मान्यवरांचा देखील त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा भाषण स्पर्धा व अन्य स्पर्धांचा बक्षीस समारंभ यावेळी होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम देखील वर्धापन दिनाचे आकर्षण ठरणार आहेत. अखेर सहभोजनाने वर्धापन दिनाची सांगता होणार आहे, अशी माहिती बेळगाव बंटर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी यांनी दिली.

पत्रकार परिषदेला संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, सेक्रेटरी चेतन शेट्टी, स्वागत समिती अध्यक्ष प्रभाकर शेट्टी व खजिनदार चेतन शेट्टी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.