सध्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता अंतर्गत राजकीय नेत्यांचे बॅनर लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
सध्या सकल मराठा समाजाचा गुरुवंदना कार्यक्रम चालू आहे. त्यासाठी मराठा समाजाच्या राजकीय पक्षांत नेते असणाऱ्या लोकांचेबॅनर लावण्यात आले होते. परंतु आचारसंहिता लागू झाल्याने हे बॅनर काढण्यात आले.
मात्र दुसरीकडे एका दुसऱ्या समाजाचे धार्मिक कार्यक्रमाचे बॅनर,जो कार्यक्रम सांगलीमध्ये होणार आहे त्यावर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या छबी आहेत. मात्र ते झळकलेले बॅनर हटविण्यात आलेले नाहीत. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
नाथ पै सर्कलमध्ये लागलेल्या या बॅनरच्या पार्श्वभूमीवर चर्चा आहे की एका समाजासाठी एक धोरण आणि एका समाजासाठी एक धोरण हे प्रसासनाचा दुटप्पीपणा नक्कीच न्याय प्रक्रियेला घातक आहे,आणि आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. यावर त्वरित कारवाई व्हावी अशी समाजातून होत आहे.