Sunday, November 3, 2024

/

युपीएससीत बैलहोंगलची युवती उत्तीर्ण

 belgaum

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील साहित्या एम. अलदकट्टी ही केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा संपूर्ण देशात 250 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नागरी सेवांच्या 2021 सालच्या आपल्या परीक्षेचा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज सोमवारी जाहीर केला असून या परीक्षेत 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये बैलहोंगलची साहित्या एम. अलदकट्टी हिने देशात 250 वा क्रमांक पटकाविला आहे. साहित्याने भुमरड्डी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हुबळी येथून माहिती विज्ञानात बी -टेक केले आहे. त्याचप्रमाणे कित्तूर राणी चन्नम्मा मुलींच्या निवासी सैनिक शाळेतून ती बारावी उत्तीर्ण झाली आहे.

यंदाच्या युपीएससी परीक्षेमध्ये श्रुती शर्मा ही देशात सर्वप्रथम आली आहे. अंकिता अग्रवाल आणि गामिनी निंग्ला या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. यूपीएससी परीक्षेत कर्नाटकातील 24 उमेदवारांचा सहभाग होता. कर्नाटकचा अविनाश बी. हा देशात 31 व्या क्रमांकासह राज्यात प्रथम आला आहे.Upsc

त्याचप्रमाणे राज्यातील 24 जणांपैकी बेनक प्रसाद एन. जी. (92 वा क्रमांक) मेलविन वर्गीस (118 वा), निखिल बसवराज पाटील (139 वा), विनयकुमार (151 वा), चित्ररंजन एस. (155 वा), अपूर्व बासुर (191 वा), मनोज आर. हेगडे (213 वा),

मंजुनाथ आर. (219 वा), राजेश पुनप्पा (222 वा), कल्पश्री के. आर. (229 वा), साहित्या एम. अलदकट्टी (250 वा), हर्षवर्धन (318 वा), गजानन बाली (319 वा), एन. डी. खमरूद्दीन खान (414 वा) आणि मेघना कट्टी (425 वा क्रमांक) हे सर्वजण यूपीएससी परीक्षेत रँकिंगमध्ये आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.