शेतकरी कामगार आणि कष्टकऱ्यांच्या संकटात असलेल्यांना मदतीसाठी नेहमी आपण तत्पर असतो हेच राहुल जानकीवयनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
बेळगाव तालुक्यातील केदनूर,अगसगा आणि मन्नीकेरी गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे.या गावातील 9 शेतकऱ्यांच्या शेतात आग लागून भाताच्या गवताच्या गंज्या जळून खाक झाल्या होत्या त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते या शिवाय जनावरांना देखील चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता अश्या 9 शेतकऱ्यांना प्रत्येकी10 हजारांची आर्थिक मदत सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून दिली आहे.बेळगाव कुवेम्प नगर येथील कार्यालयात त्यांनी या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली आहे.
गेल्या वीस वर्षापासून बेळगाव दक्षिण मतदारसंघातला खासबाग मधील कुंती नगर येथे संपर्क रस्ता नव्हता त्यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
के पी सी सी चे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडे कुंती नगर येथील रहिवाशांनी तक्रार करत रस्ता करा अशी मागणी केली होती त्यानुसार राहुल जारकीहोळी यांनी या कुंती नगरमधील संपर्क रस्त्यासाठी एक लाखाच्या लाखांची आर्थिक मदत देऊ केली.
यावेळी काँग्रेस नेते मलगोंडा पाटील एमजी प्रदीप, अरुण कटाबंळे परशुराम ढगे आप्पाजी गौडा पाटील अमृत मुद्द्यांनावर महादेव संभाजी,यल्लप्पा बिरजे आदी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी सतीश जारकीहोळी फौंडेशनच्या माध्यमातून युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी बेळगाव शहर आणि परिसरातील मंदिरे मशिदी आणि समुदाय भवनासाठी साऊंड सिस्टिम भांडी खुर्च्या आदी सामानांची मदत दिली होती त्यानंतर आज शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि रस्त्यासाठी आर्थिक मदत देत सामाजिक कार्य चालूच ठेवले आहे.