आपल्या मायबोली मराठी संस्कृतीमध्ये आपण ऐकलंच आहे कसा परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी अनवाणी पायाने येतो आणि देवाची हाक ऐकताच भक्त कसा देहभान विसरून पंढरीकडे धावतो. असाच एक प्रसंग बेळगावात पाहावयास मिळाला.
कोरोना काळात झालेल्या दोन वर्षाच्या वनवासानंतर आपल्या गुलालाने माखलेल्या प्रिय ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी प्रसाद पुंडलिक उंदरे या युवकाने बेळगाव ते जोतिबा डोंगर हा १३० की मी चा प्रवास सायकल वरून १२ तासापेक्षा कमी वेळेमध्ये पार केला. गुरवार दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ०५०० वाजता या प्रवासाची सुरवात करत शिवाजी नगर बेळगाव ते ताराराणी चौक कोल्हापूर हा १०० की मी चा टप्पा अवघ्या सात तासात पार केला.
ऊन पाऊस वारा या कशाचीही पर्वा न करता सायंकाळी ५ च्या सुमारास प्रसादने आपल्या लाडक्या देवाचे डोंगर गाठले. शनिवारी दिनांक १६ एप्रिल रोजी डोंगरात ज्योतिर्लिंगाची यात्रा आहे. या यात्रेसाठी हजारो भक्त डोंगरावर जमत आहेत याच भक्तिरसामध्ये डुबणाच्या वेडापोटीच प्रसाद ने हा पराक्रम केला. आजकालची तरुणाई सोशल मीडिया आणि पब जी सारख्या आभासी दुनियेमध्ये हरवली असताना या युवकाने आपल्या छोट्याशा कृतीद्वारे त्यांना जागवणाचे कार्य केले आहे.
एकीकडे स्वतःला महाराजांचे मावळे म्हणत असताना आपल्या मध्ये आपल्या संस्कृतीची जाणं, भक्ती आणि शारीरिक क्षमता कितपत आहे ? हा प्रश्न प्रत्येक मराठी तरुणाने स्वतःला विचारला पाहिजे.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः । ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये विश्वकल्याणाची कामना केली. आपल्या बेळगावचा पुत्र प्रसाद देखील असाच आपल्या लाडक्या ज्योतिबाच्या दरबारामध्ये हात जोडून आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत असणार. ज्योतिबाच्या नावाने चांगभलं !!