श्री चांगळेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात महत्वाच्या कुस्त्या झाल्या नाहीत सायंकाळी आलेल्या जोरदार पावसानंतर खुर्च्या डोक्यावर घेऊन प्रेक्षकांनी पावसाचा सामना केला.
दोन वर्षे सीमाभागातील सर्वात मोठे मैदान कोरोना मुळे भरले नव्हते मात्र यावर्षी हजारो कुस्ती शौकिन उपस्थित होते मात्र पावसाने त्यांचा हिरमोड केला.
दोन वर्षाच्या दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात लाल मातीच्या पैलवान स्वाद घेत पैलवानांनी पुन्हा आपली ताकत आजमावले होती .गुरुवारी दुपारी झालेल्या येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात एकंदर 49 कुस्त्यांची लढत झाली
यामधील पहिल्या दिग्गज पैलवानांच्या एकंदर आठ कुस्त्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या यावेळी बेळगाव शहरातील बाल पैलवानांनी महिला पैलवानांनी आपले प्रात्यक्षिक दाखविले.
कुस्ती शौकिनांनी महाराष्ट्र मैदानात दुपारी तीन वाजल्यापासून गर्दी केली होती मोठा जनसागर जमा होऊन कुस्ती पाहण्यासाठी 50 हजार अधिक लोकांनी गर्दी केली होती मात्र मोठया कुस्त्या पावसाने रद्द झाल्या.मैदानाला विधानपरिषद सदस्य लखन जारकीहोळी यानी भेट दिली.