भिंत कोसळून कामगार जण ढिगाऱ्याखाली सापडून ठार झाल्याची घटना बेळगाव शहरातील वृंदावन हॉटेलसमोर महादेव गल्ली येथे आज गुरुवारी दुपारी घडली.
महादेवप्पा वय 55 रा.बैलहोंगल असे या घटनेत गुदमरून मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महादेव गल्ली येथे एका घराचे काम सुरू जुन्या घराची भिंत कोसळून हा कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता याबाबत आसपासच्या नागरिकांनी तात्काळ स्थानिक नागरिकांनी ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या त्या कामगाराचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न चालविले होते मात्र त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही.
घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती घटनास्थळ शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे मारुती गल्ली परिसरात असल्याने सदर घटना वाऱ्यासारखी बाजारात बसली होती
श्वास गुदमरून त्या कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांचा दौरा ही त्याच वेळी असल्याने पोलिस आणि बचावकार्य वेळेत पोहोचू शकले नाही या घटनेप्रकरणी खडे बाजार पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.