कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी उडपी पोलिसांनी आज मंगळवारी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांची भेट घेऊन सखोल चौकशी केली.
समर्थ कॉलनी, लक्ष्मीनगर -हिंडलगा येथील नागेश मनोळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन उडपीचे पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने मन्नोळकर यांच्याकडे कंत्राटदार संतोष पाटील यांनी केलेल्या सर्व 108 विकासकामांची माहिती जाणून घेतली. तसेच या संदर्भात अधिक चौकशी सुरू ठेवली आहे.
एवढेच नव्हे तर पोलिसांनी नागेश मनोळकर यांच्या निवासस्थानामधून कांही कागदपत्रे ही ताब्यात घेतली आहेत. यांच्याव्यतिरिक्त मयत कंत्राटदार संतोष पाटील यांच्या समवेत काम करणाऱ्या 12 उपकंत्राटदारांना देखील उडपी पोलीस तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी मन्नोळकर यांच्या निवासस्थानी बोलावून घेऊन त्यांची चौकशी केली.
बारा सब कंत्राटदारांनी केली कामे-मन्नोळकर
कंत्राटदार संतोष पाटील यांनी बारा जणांना सब कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम केलेला आहे चार कोटीची 108 कामे त्यांनी केलेले आहेत संतोष पाटील याने 50 लाखाचे काम स्वतः केला असून उरलेली कामे दुसर्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिली होती माहिती हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी दिली.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. संतोष पाटील हा आर डी पी आर चा निधी आहे असं सांगत होते. कालच इतर सब कंट्रक्शन ठेकेदार आणि आम्ही रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली होती असेही ते म्हणाले.
यापूर्वी या कामाच्या बाबतीत रमेश जारकीहोळी यांनी ईश्वरप्पा यांना भेटा असे सांगितले नव्हते वर्क ऑर्डर बाबत मला काय माहिती नाही याबाबत संतोष पाटील यास फॉलोअप घेत होते.
त्या कामासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव केलेला नाही. हा आर डी पी आर चा स्पेशल निधी होता त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये ठराव ची गरज नाही असे संतोष पाटील म्हणत होते हिंडलगा ग्रामपंचायतींमध्ये कामे झाली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले
संतोष पाटील वर पैशाच्या बाबतीत कोणतेही दडपण आणलं नव्हते सब कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही देखील पैशाच्या दडपण आणलं नव्हतं मला भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे कन्नड येत नसल्यामुळे मी जास्त काही बोलत नव्हतो मात्र संतोष पाटील यांचं ईश्वरप्पा यांच्या सोबत बोलणं झालं होतं असे मन्नोळकर म्हणाले.