बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर ” रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022 ” या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.
सामाजिक कार्यकर्ते राकेश कलघटगी, शशिकांत खुले, तुकाराम पाटील, विनयकुमार बागली, श्रीकांत मेंडके, संगीता निलज, प्रमिळा शिलेदार, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या उपस्थितीत स्केटिंग स्पर्धेला चालना देण्यात आली.
500 मीटर रिंक रेसमध्ये क्वाड स्केटिंग प्रकारात पाच वर्षांखालील मुलांच्या विभागात वीर गोंदवले यांनी एक सुवर्ण, अधिराज कामते याने एक रौप्य तर मुलींच्या विभागात साई बेळगावकर यांचे एक सुवर्ण तसेच सावी तोडकर हिने एक रौप्य पदक पटकाविले.पाच ते सात वयोगटात मुलांच्या विभागात श्रीयंश पांडे याने सुवर्ण, भागीरथ पाटील याने एक रौप्य तर अन्वित शिंगाडी याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात झिया काझी हिने एक सुवर्ण, आराध्या माळी हिने एक रौप्य तर अनन्या पाटील हिने एक कांस्य पदक पटकावले.
सात ते नऊ वयोगटात मुलांच्या विभागात वेदांत तोडकर याने सुवर्ण, सार्थक चव्हाण याने एक रौप्य तर धैर्यशील वाटकर याने एक कास्यपदक तसेच मुलीच्या विभागात प्रांजल पाटील हिने एक सुवर्ण, ध्रुवा पाटील हिने एक रौप्य तर प्रणाली श्रेयकर हिने एक कास्य पदक मिळविले.
नऊ ते अकरा वयोगटात मुलांच्या विभागात कुलदीप बिर्जे याने एक सुवर्ण, सर्वेश पाटील याने एक रौप्य तर वेदांत पाटील याने एक कांस्यपदक तसेच मुलींच्या विभागात अनन्या बागली हिने एक सुवर्ण, दिशा आर हिने एक रौप्य तर सानवी शिंदे हिने एक कांस्यपदक मिळविले.11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात सत्यम पाटील याने एक सुवर्ण, भव्य पाटील याने एक रौप्य, सुब्रमण्यम बागलकोट याने एक कांस्यपदक तर मुलींच्या विभागात श्रेया पाटील हिने एक सुवर्ण, पल्लवी पाटील हिने एक रौप्य तसेच आदिती बागली हिने एक कास्य पदक मिळविले.
14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात साई समर्थ अंजन याने एक सुवर्ण, निलेश राजपूत याने एक रौप्य तर प्रथमेश गौरव याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात विशाखा फूलवाले हिने एक सुवर्ण, अंजू गुडमसमर हिने एक कांस्य, तसेच अनुपमा पाटील हिनेही एक कांस्यपदक पटकाविले.इनलाइन स्केटिंग प्रकारात पाच वर्षांखालील मुलांच्या विभागात विश्वजीत पवार यांचे एक सुवर्ण तर आरुष अर्कसाली याने एक रौप्य पदक मिळविले. पाच ते सात वयोगटात मुलांच्या विभागात आकाश जाधव याने एक सुवर्ण तर हर्षद तेरणी याने एक रौप्य तसेच मुलींच्या विभागात आरोही शिलेदार हिने एक सुवर्ण पदक मिळविले.सात ते नऊ वयोगटात मुलींच्या विभागात आराध्या बामणगोळ हिने एक सुवर्ण, आर्या नेथे हिने एक रौप्य तर राही निलज हिने एक कांस्यपदक मिळविले.
नऊ ते अकरा वयोगटात मुलांच्या विभागात प्रीतम निलज याने एक सुवर्ण, शिवेंद्र पोवार याने एक रौप्य तर श्रीयंश न्यामगौड याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात अनवी सोनार हिने एक सुवर्ण पदक मिळविले.
11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात साईराज मेंडके याने एक सुवर्ण, अथर्व भुते याने एक रौप्य तर सर्वेश कुडाळे याने एका कांस्यपदक मिळवणे. 14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात वेद बेल्लद त्याने एक सुवर्ण तर ओम सोमण याने एक रौप्य पदक पटकाविले.
17 वर्षांवरील मुलांच्या विभागात आदित्य बाळीकाई याने सुवर्णपदक पटकावले.टेनासिटी स्केटिंग प्रकारात पाच ते सात वयोगटात मुलांच्या विभागात अमेय मानवाडी याने एक सुवर्ण, शार्दुल पाटील याने एक रौप्य तर लव हंपन्नावर याने एक कांस्यपदक मिळविले.
पाच ते सात वयोगटात मुलींचा विभागात प्रिशा मारियाळ हिने एक सुवर्ण, सात ते नऊ वयोगटात मुलींच्या विभागात सवाशी शर्मा हिने एक सुवर्ण तर आनवी पाटील हिने एक रौप्यपदक मिळविले.
नऊ ते अकरा वयोगटात मुलांच्या विभागात आर्यन कुडाळे याने एक सुवर्ण, संकल्प पी. एम. याने एक रौप्य तर विहान कांबळे याने एक कास्यपदक तर मुलींच्या विभागात स्वराली राजपूत हिने एक सुवर्ण, प्रीती जाधव हिने एक रौप्य तर तेजस्विनी पाटील हिने एक कास्य पदक मिळविले.
नऊ ते अकरा वयोगटात मुलांच्या विभागात अर्णव कुरबुर याने एक सुवर्ण, 11 ते 14 वयोगटात मुलींच्या विभागात लावण्या रॉय हिने एक सुवर्ण तर 14 ते 17 वयोगटात मुलींच्या विभागात कामाक्षी कुरबुर हिने सुवर्णपदक पटकाविले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, अजित शिलेदार, नितीन कुडाळे, सागर चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.