Wednesday, December 25, 2024

/

ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचा : काँग्रेसचा आरोप

 belgaum

ईश्वरप्पा राक्षस प्रवृत्तीचे आहेत. राजीनामा देणार नाही असे सांगत बंडखोरीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्याना काय म्हणावं? असा संताप काँग्रेस विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केलाय.

आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बेंगलोर होऊन बेळगावला विशेष विमानाने आलेल्या काँग्रेसने नेत्यांनी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील संताप व्यक्त केला आहे.
केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, कॉंग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी बेळगावात दाखल झालेले आहेत.

Sidhramayya
Sidhramayya

मंत्री किंवा सरकारच्या हो करा शिवाय कोणताही ठेकेदार काम करणे शक्य नाही हा कॉमन सेन्स असलेला विषय आहे. आमदार संतोष पाटील याने कर्ज काढून काम पूर्ण केलेल आहे त्याला 40%कमिशन साठी छळण्यात आलंय. असे केवळ ईश्वरप्पाचं नव्हे तर सरकार मधील सर्वच मंत्री करत असतात असा आरोप यावेळी सिद्धरामय्या यांनी केला.

वर्क ऑर्डर नसताना काम केला या भाजपच्या भूमिकेवर सिद्धरामय्या म्हणाले की गेल्या नंबर महिन्यांमध्येच ईश्वर आप्पा 40 टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप संतोष पाटील यांनी माध्यमांकडे केला होता. त्यावेळी का कारवाई केली गेली नाही? पंतप्रधाना साहित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि भाजपचा सर्व मंत्र्यांना देतील पत्र लिहून तक्रार करण्यात आली होती आता वर्क ऑर्डर बोलत आहेत असे त्यांनी नमूद केलं.

यावेळी विमानतळावर ईश्वर खंडरे, माजी मंत्री एम बी पाटील, राजू सेठ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.