Wednesday, February 12, 2025

/

नवी गल्ली येथे इफ्तारी मेजवानी खेळीमेळीत

 belgaum

पवित्र रमजान सणानिमित्त नवी गल्ली, शहापूर येथे आयोजित हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन घडविणारा इफ्तारी मेजवानीचा कार्यक्रम नुकताच खेळीमेळीत पार पडला.

सालाबाद प्रमाणे रमजान सणानिमित्त नवी गल्ली शहापूर येथील मुस्लिम बांधवांतर्फे इफ्तारी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन घडविणाऱ्या स्नेह भोजनाच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, उदय पाटील आणि नगरसेवक रवी साळुंके, त्यांच्यासह निमंत्रित पाहण्या म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव, रवी शिंदे, सचिन गुरव, मनीष रामचंदानी, भवानी राजपुरोहित, अमजद मोमिन, हमीद बागलकोट, अब्दुल बागलकोट, सल्लू पटेल, बशीर मुल्ला आदी उपस्थित होते.Iftiyar

इफ्तारी मेजवानीपूर्वी आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधिकारी बडीगेर, नगरसेवक साळुंखे आणि नेताजी जाधव यांनी समयोचित विचार व्यक्त केले. सध्याची देशातील एकंदर परिस्थिती पाहता जातीय सलोखा किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी विषद केले.

त्याचप्रमाणे नवी गल्ली येथील मुस्लिम बांधवांकडून हिंदू-मुस्लीम जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तसेच याचा आदर्श इतरांनी घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमानंतर इफ्तारी मेजवानी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.