कोरोनाच्या चौथ्या लाटे संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली होती. या बैठकीत परदेशातील कोरोना परिस्थितीचा आढावा, त्याचबरोबर आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारी यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंगळूर दौरा रद्द करून आपल्या कृष्णा गृहकचेरीतूनच सहभागी झाले होते. या बैठकीत आपण देखील होतो. बैठकीत उपयुक्त सल्ला सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सद्य परिस्थितीत भारत सरकारने 6 वर्षावरील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे.
ही लस प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला मिळाल्याने या रोगावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. त्याचप्रमाणे 60 वर्षावरील नागरिकांना ही लस मोफत देण्यात येत असून 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींनी लसीचा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्यास बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कांही कोरोना वारियर्सना कामावरून कमी करण्यात आले आहे. मात्र आता कंत्राटी तत्वावर अनेकांना कामालावर घेण्यात येत असून 6 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी हे कंत्राट असणार आहे.
गेल्या 6 महिन्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याने 18 महिन्यांचे कंत्राट संपलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असले तरी वित्त विभागाच्या आदेशानुसार आणखी 6 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.