कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात मी पूर्णपणे निर्दोष आहे. या प्रकरणात मी एक टक्का जरी चूक केली असेल तर मला शिक्षा करण्यात यावी, असे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
शिमोगा येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही.
या प्रकरणात माझी कोणतीच चूक नाही. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपास अधिकारी सर्वांगाने तपास करीत आहे.
या प्रकरणातून मी निर्दोषपणे बाहेर पडून सर्व आरोपातून मुक्त होईन असा मला विश्वास आहे असे सांगून आपल्यावर निष्कारण आरोप करण्यात आले असल्याचे मंत्री ईश्वरप्पा यांनी सांगितले.