Friday, November 15, 2024

/

कष्टकरी महिलांसाठी भरले आरोग्य शिबिर

 belgaum

मजदूर नवनिर्माण संघ, आश्रय फौंडेशन व ऑपरेशन मदत यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूल आंबेवाडी येथे मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. –

भगतसिंग हायस्कूल आंबेवाडी येथे ऑपरेशन मदत, आश्रय फौंडेशन व मजदूर नवनिर्माण संघाच्या माध्यमातून आंबेवाडी ग्रामपंचायतीमार्फत रोजगाराचे काम करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी या मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.

कार्यक्रमाला राईट लिमिटेडचे लक्ष्मण तापसी, जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर, नागरत्ना, शिवाजी अतीवाडकर, जयवंत साळुंखे, नागेश देसाई, डाॅ राजश्री अनगोळकर, डाॅ रविंद्र अनगोळकर, डाॅ मीना पाटील, डाॅ स्मिता गोडसे, विठ्ठल देसाई व आंबेवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आरोग्य शिबिरात आएएमए बेळगांव, श्री ऑर्थो हाॅस्पीटल, केएलई कंकनवाडी हाॅस्पीटल, आयडीए, भरतेश काॅलेज, उचगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल डाॅक्टर् व लॅब असिस्टंट, आंबेवाडी गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आश्रय फौंडेशनचे सदस्य व मजदूर नवनिर्माण संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन गावकऱ्यांना सेवा दिली.Health camp

या मेडिकल कॅंपमध्ये महिला कामगारांनी उपस्थिती लावून स्वत:ची व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

जनरल हेल्थ चेक-अप, ऑर्थोपेडीक, स्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, बी.पी. – शुगर, हिमोग्लोबिन, आय – चेक-अप, डेंटल चेक-अप – अशा विविध विभागाद्वारे तपासणी शिबिर घेतले गेले, व त्यावरील गोळ्या, औषधांचे व प्रोटीन पावडरचे मोफत वितरण करण्यात आले. राहुल पाटील यांनी सर्व महिलांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.