मला कोणताही रोग नाही म्हणजे मी निरोगी आहे असे नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक सक्षमतेबरोबरच अध्यात्मिकरीत्या पण आपण सक्षम असले पाहिजे तरच आपण संपूर्णपणे निरोगी असू शकेन. हल्ली अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे असे विचार डॉ सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले.
निलजी येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये श्री अम्माभगवान मानवसेवा समिती आणि जिव्हाळा फौंडेशनच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या.
औषधांबरोबर आध्यात्मिकतेची तितकीच गरज असल्याचे सांगताना डॉ पोटे म्हणाल्या की अध्यात्मामुळे माणूस सकारात्मक होतो आणि यामुळे तो अधिक सदृढपणे जगू शकतो.या मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी,हाडांची ठीसुळता, बी.पी. – शुगर, हिमोग्लोबिन,थायरॉइड,नेत्र तपासणी, दातांची तपासणी अशा विविध तपासण्या गेल्या.
यावेळी गरजू रुग्णांना मोफत गोळ्या औषधांचे वितरण करण्यात आले.तत्पूर्वी सुरुवातीला या आरोग्य शिबिराचा उदघाटन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण पाटील हे होते.
व्यासपीठावर जिव्हाळा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुरेखा पोटे, संस्थापिका डॉ सविता कद्दु, आय एम ए च्या अध्यक्षा डॉ राजश्री अनगोळ, माजी जिल्हा पंचायत सदस्य आर.सी.मोदगेकर, श्री अम्मा भगवान सेवा समितीचे आर एम चौगुले, डॉ सविता देगीनाळ, डॉ शीतल पोरवाल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन बामणे यांनी केले.
डॉ सविता कद्दु यांनी आरोग्यदेवता धन्वंतरी देवी आणि श्री अम्माभगवानांची पूजा करून शिबिराचे उदघाटन केले.
त्यानंतर व्यासपीठावरील तसेच निलजी ग्राम देवस्की पंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ मंडळींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ सविता कद्दु आणि आर.सी.मोदगेकर यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय विचार मांडताना हे मोफत आरोग्य शिबीर आपल्या गावांसाठी कसे उपयुक्त आहे हे सांगत असताना प्रत्येकाने या विविधांगी शिबिराचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
या शिबिराचा निलजी गावातील अनेक गरजू ग्रामस्थांनी लाभ घेतला
हे आरोग्यशिबिर यशस्वी करण्यासाठी किरण मोदगेकर,शिवराम देसाई, कल्लाप्पा मोदगेकर, पिराजी मोदगेकर, यल्लाप्पा पाटील,रोहित गोमानाचे, सुरज मोदगेकर, संतोष मोदगेकर, चंद्रकांत पाटील व संतोष हिराप्पाचे यांचे भरपूर सहकार्य लाभले.जिव्हाळा फौंडेशनचे सुहास हुद्दार, शेखर पाटील तसेच श्री अम्माभगवान सेवा समितीचे सदस्य उपस्थित होतेसूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केले.
शेवटी डॉ मधुरा गुरव यांनी आभार मानले.