15 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय कला दिन असून गुलमोहर बागच्या कलाकार मंडळीतर्फे कलामहर्षी के.बी कुलकर्णी कलादालन, वरेरकर नाट्य संघ टिळकवाडी येथे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावातील कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा समूह सातत्याने प्रयत्नशील आहे. 2018 पासून सुरुवात करून आज या समूहाने मोठी प्रगती केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शने आयोजित करण्याचा वसा त्यांनी जपला आहे. कलाकृतींची विक्री करून लॉकडाऊनच्या काळात कोविड रिलीफ फंडासाठी 1.80 लाख रुपयांची देणगीही दिली.
बेळगावातील सर्व नागरिकांसाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुभाष देसाई, प्राचार्य-जे.एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट, श्रीमती स्वाती जोग – संस्थापक, ईशान्या व्हेंचर्स हे उपस्थित होते.
सांगलीतील मंगेश पाटील या कलावंताने प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात पोर्ट्रेट पेंटिंगचा लाइव्ह डेमो सादर केला.
आजपासून सुरू होणारे पाच दिवसांचे हे प्रदर्शन 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ऑईल, पेस्टल्स, अॅक्रेलिक, वॉटरकलर आणि मिश्र माध्यमे अशा माध्यमांमध्ये ज्येष्ठ कलावंत तसेच तरुण नवोदित कलावंतांच्या काही अप्रतिम कलाकृती यात दाखवण्यात आल्या आहेत. यातील अनेक कलाकृती विक्रीसाठीही उपलब्ध आहेत.
गुलमोहर बागेच्या कलाकारांनी ‘लाइफ लाइन्स ऑन कॅनव्हास’ ही अनोखी संकल्पना आणली आहे. बेळगावातील लोकांच्या हाताच्या ठशांनी एकच मोठा कॅनव्हास रंगविला जाणार असून ही निर्मिती सांबरा विमानतळावर कायमस्वरूपी प्रदर्शित केली जाणार आहे.
१७ ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत केबीके आर्ट गॅलरी, वरेरकर नाट्य संघ येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत हा कॅनव्हास प्रदर्शित करण्यात येणार आहे. व्हीव्हीआयपींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच कॅनव्हासवर हात छापून या प्रकल्पाचा भाग होण्यासाठी आवाहन केले आहे.
या प्रदर्शनात रोज आर्ट डेमोही असतील, ज्यात विविध कलाप्रकार, शैली आणि कोणत्या माध्यमांमध्ये कलेचा शोध घेता येईल याचे प्रात्यक्षिक तज्ज्ञ दाखवतील.
चंद्रशेखर रांगणेकर, महेश होनुले, प्रिया खटाव, वृषाली मराठे, हिमांगी प्रभू, ज्योती शरद, शौर्यिका गरगट्टी, सचिन उपाध्ये यांच्यासह ३७ कलाकारांच्या कलाकृती तसेच निवृत्त आयकर आयुक्त श्री. बेलगली यांची चित्रेही पाहता येतील.