बेळगाव शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकास कामांसाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) निविदा काढल्या आहेत.
शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी बुडाने निविदा काढल्या असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अनगोळ तानाजी गल्ली, उद्यमबाग आणि अरिहंत मंदिरानजीकचा साळेश्वर देवस्थान रोड या रस्त्यांचा विकास -44575233.50 रुपये. राणी चन्नम्मानगर फर्स्ट स्टेज,
भवानीनगर, सुभाषचन्द्र नगर आणि वाटवे कॉलनी रस्त्यांचा विकास -43436472.13 रुपये. ओम नगर, आरसी नगर सेकंड स्टेज आणि कुलकर्णी गल्ली रस्त्यांचा विकास
-41019443.61 रुपये. आनंदनगर, राजहंस गल्ली आणि भाग्यनगर रस्त्यांचा विकास -43178871.15 रुपये. रामतीर्थनगर परिसर स्वच्छतेसाठी (6 महिन्यासाठी) कामगारांचा पुरवठा -1210642.65 रुपये.