शिवजयंती मिरवणुकीत पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी चव्हाट गल्लीच्या पाच कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बेळगाव प्रथम वर्ग तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीशा काटे यांनी बजावला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी अनंत दवणे रोहन जाधव प्रवीण किल्लेकर प्रवीण कुटरे आकाश धुराजी सर्वजण रा. चव्हाट गल्ली या सर्वांची साक्षीदारांच्या विसंगती मुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की 30 एप्रिल 2017 रोजी शिवजयंती निमित्त बेळगाव शहरातील अनेक शिवजयंती मंडळांनी चित्ररथ मिरवणूक काढली होती त्या मिरवणुकीत दरम्यान चव्हाट गल्लीच्या काही कार्यकर्त्यांनी 1 मे रोजी पहाटे पाच वाजता शिवजयंती उत्सव मंडळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक मंडळाचा देखावा मारुती गल्ली येथील सिंडिकेट बँक जवळ आला असता
मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्त्यांनी, पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता, मिरवणूक सावकाशपणे हाकने, पोलिसांना अरेरावी करणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणेआणि ‘काही करा आम्ही कुणाला घाबरत नाही’ आमचे फोटो काढून घ्या’ असे सांगत पोलिसांना त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे, असा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी सेक्शन 143,353,283 सह कलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन खडे बाजारचे पोलीस निरीक्षक यु ए सातेनहळळी यांनी संबंधित कार्यकर्त्यावर केलेल्या पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करता न आल्याने, पोलीस आणि साक्षीदार यातील विसंगती मुळे संशयित कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
चव्हाट गल्लीतील शिवजयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वकील प्रताप यादव वकील हेमराज बेंचण्णावर स्वप्नील नाईक यांनी काम पाहिले.