Friday, December 27, 2024

/

लवकरच बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा : मंत्री जोल्ले

 belgaum

बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवी रेल्वेसेवा सुरू होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी ग्रामपंचायत हद्दीतील टांगाकोडी येथील कट्टीकर शिवारात श्री बिरेश्वर देवस्थान विकास कामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या. मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जातात.

त्या भक्तांना राज्य सरकारकडून 5 हजार रुपयांची सवलत देण्यात येईल. लवकरच ही योजना सुरु करण्यात येईल. त्याचप्रमाणे बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा देखील सुरू केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेचे उद्घाटन केले जाईल असे सांगून श्री बिरेश्वर देवाच्या कृपेने माझी व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची राजकीयदृष्ट्या चांगली वाटचाल सुरू आहे. धर्मादाय, हज आणि वक्‍फ खाते मला मिळाले हे माझे भाग्य आहे, असेही मंत्री जोल्ले यांनी सांगितले.

याप्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिता देवडकर, अण्णासाहेब गावडे, सुभाष चौगला, रेवय्या हिरेमठ, धुळू मोळके, राजाराम भोसले, अण्णाप्पा यमगर, करेप्पा दिन्नीमणी, अशोक टोन्ने, सुरेश माळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.