Wednesday, January 1, 2025

/

अंगणवाडीतून किडलेल्या आहाराचा पुरवठा- ग्राम पंचायतीन उठवला आवाज

 belgaum

बेळगाव ग्रामीण भागातील अंगणवाड्या मधून किडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्य आहाराचे वितरण करण्यात येत आहे या विरोधात बिजगरनी ग्रामपंचायतीने आवाज उठवला आहे.
बेळगाव तालुका महिला आणि बाल कल्याण खात्याच्या माध्यमातून वितरण करण्यात येणाऱ्या गरोदर महिला आणि लहान मुलांच्या आहाराचे वाटप करणाऱ्या त्या संस्थेची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने 6 वर्षाखालील आणि गरोदर महिलांना चांगला आहार मिळावा पोषक अन्न मिळावे या उदात्त हेतूने करोडो रुपये खर्च केले जातात मात्र अंगणवाड्यातून वितरित केल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाचे अन्न वितरण केले जात आहे.तांदूळ, मुग,तूरडाळ गुळ शेंगदाणे अंडी रवा आदी प्रकारचे धान्य वितरण केले जाते.

अलीकडेच हा पुरवठा पाकीट बंद स्वरूपात करण्यात येत आहे गोरगरीब जनतेला लहान मुलांना कुपोषण व चांगल्या प्रतीचा आहार मिळावा हा उद्देश ठेवून गरोदर महिलांना लहान मुलांना हे रेशन वितरण करण्यात येते आहे मात्र गेल्या काही महिन्यापासून यावर कुणी आवाज उठवत नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचे किड असलेल्या धान्याचा पुरवठा या अंगणवाडीच्या माध्यमातून केला जात आहे.Bijgarni

बिजगरणी ग्रामपंचायतीच्या पाचही गावांमध्ये असा निकृष्ट दर्जाचा पुरवठा करत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांना मिळाली असता त्यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ हिरेमठ यांना बोलावून त्यांच्या समक्ष वितरित होणारी पाकिटे खोलून बघितल्यानंतर या मुगाच्या पाकिटामध्ये काळे किडे, दहा टक्केसुद्धा मुग चांगले दर्जाचे नव्हते व तूर डाळ एकदम हलक्या दर्जाची होती ती शिजत पण नव्हती या शिवाय अंडी सुद्धा अवधी संपलेली आणि निकृष्ट दर्जाचे शेंगदाणे होते.

माणसं नाही तर जनावर सुद्धा खाण्याच्या दर्जाचे हे अन्नधान्य नव्हते त्यासाठी या भागातील सर्व अंगणवाड्यानी सदर निकृष्ट दर्जाचे आणि किडलेल्या अन्न धान्य जनतेमध्ये गरोदर महिला आणि 6 वर्षाखालील मुलांना वितरण करु नये असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. आगामी काळात सदर आहार व्यवस्थित वितरित न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील या पंचायतीने दिला आहे.यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर सदस्य वकील नामदेव मोरे, महेश पाटील शितल तारीहाळकर मंगला जाधव रेखा नाईक आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.