कर्नाटक स्टेट ॲपीलंट ट्रॅबूनलच्या (केएसएटी) नव्या या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक जमिनीचा मालकी हक्क केएसएटीकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम काल सोमवारी पार पडला.
महसूल खात्याकडून सिंधी कॉलनी, वेंगुर्ला रोड, हिंडलगा येथील सर्व्हे नं. 189 / ए /2 या एक एकर 20 गुंठे जागेचा ताबा काल सोमवारी कर्नाटक स्टेट ॲपीलंट ट्रॅबूनलकडे देण्यात आला.
सदर जमिनीवर केएसएटीची कार्यालयीन इमारत उभारण्यात येणार आहे. मालकी हक्क सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कर्नाटक स्टेट ॲपीलंट ट्रॅबूनलचे न्यायिक सदस्य राज्याचे निबंधक नारायण स्वामी,
के ए टी नागरत्ना ,बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर बी. चव्हाण, संयुक्त सचिव ॲड. बंटी कपाई, सदस्य ॲड. इरफान बायल, ॲड. संतोष शहापूर, ॲड. सोमू गोड्डर, ॲड. संपतकुमार नेमगौडा आदींसह महसूल खात्याचे अधिकारी उपस्थित होते.