दिवसेंदिवस बेळगाव विमानतळावरून देशातील वेगवेगळ्या शहरांना विमानसेवा वाढत असताना खेदाची बाब ही की प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी ट्रू जेटने आपल्या सेवा रद्द केल्यामुळे दोन शहरांशी असणारा आपला संपर्क बेळगावला गमवावा लागला आहे.
सरकारच्या उडान या प्रादेशिक विमान सेवा योजनेत अग्रभागी असणाऱ्या टर्बो मेगा (ट्रू जेट) या प्रादेशिक विमान कंपनीने बेळगावातून सुरू असलेल्या आपल्या सर्व सेवा रद्द केल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत टर्बो मेगा (ट्रू जेट) कंपनीच्या पुढील मार्गावर विमान सेवा होत्या.
बेळगाव ते कडप्पा, बेळगाव ते म्हैसूर, बेळगाव ते हैदराबाद आणि बेळगाव ते तिरुपती. मात्र आता सदर कंपनीने आपल्या या सेवा रद्द केल्यामुळे बेळगावचा कडप्पा आणि म्हैसूरशी असलेला संपर्क तुटला आहे. स्पाइस जेट आणि इंडिगोच्या सहकार्याने स्टार एअरची तिरुपती आणि हैदराबादची विमान सेवा उपलब्ध आहे.
या पद्धतीने सध्या देशातील 15 शहराशी संपर्क असणाऱ्या बेळगावचे दोन शहरांशी असलेला संपर्क संपुष्टात आला आहे. टर्बो मेगा (ट्रू जेट) कंपनीने आज जारी केलेल्या वेळापत्रकात उन्हाळ्यातील विमान सेवेचा उल्लेख केलेला नाही. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या वेळापत्रकामध्ये त्यांनी बेळगाव विमानतळावरून इतर कोणत्या नव्या मार्गाची देखील घोषणा केलेली नाही. कांही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणीमुळे सदर विमानसेवा तात्पुरती रद्द करण्यात आल्या असून लवकर त्या पूर्ववत सुरू केल्या जातील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या कंपनीला गेल्या 2020 पासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
बेळगावच्या विमानसेवा पुढील प्रमाणे आहेत. 1) बेळगाव -बेंगलोर, 2) बेळगाव -दिल्ली, 3) बेळगाव -मुंबई (2), 4) बेळगाव -हैदराबाद (2), 5) बेळगाव -अहमदाबाद, 6) बेळगाव -सुरत, 7) बेळगाव -पुणे, 8) बेळगाव -नागपूर 16 एप्रिल पासून, 9) बेळगाव -जोधपुर, 10) बेळगाव -नाशिक, 11) बेळगाव -इंदोर आणि 12) बेळगाव -तिरुपती. कनेक्टिंग एक थांबा विमानसेवा पुढील प्रमाणे आहेत. 1) बेळगाव -कलबुर्गी (तिरुपती मार्गे), 2) बेळगाव -किशनगढ (सुरत मार्गे), 3) बेळगाव -नाशिक (पुणे मार्गे).
उडान मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. 1) बेळगाव ते हैदराबाद -इंटर ग्लोब (इंडिगो), स्पाइस जेट, टर्बो मेगा (ट्रू जेट), 2) बेळगाव ते मुंबई -स्पाइस जेट, घोडावत (स्टार एअर), 3) बेळगाव ते पुणे -अलाइंस एअर, 4) बेळगाव ते सुरत -घोडावत (स्टार एअर), 5) बेळगाव ते कडप्पा -टर्बो मेगा (ट्रू जेट) सेवा तूर्त रद्द, 6) बेळगाव ते म्हैसूर -टर्बो मेगा (ट्रु जेट) सेवा तूर्त रद्द, 7) बेळगाव ते इंदोर -घोडावत (स्टार एअर), 8) बेळगाव ते जोधपुर -घोडावत (स्टार एअर), 9) बेळगाव ते अहमदाबाद -घोडावत (स्टार एअर), 10) बेळगाव ते ओझर (नाशिक) -घोडावत (स्टार एअर), 11) बेळगाव ते तिरुपती -घोडावत (स्टार एअर), टर्बो मेगा (ट्रू जेट), 12) बेळगाव ते नागपूर -घोडावत (स्टार एअर) 16 एप्रिलपासून प्रारंभ, 13) बेळगाव ते जयपूर -घोडावत (स्टार एअर) अद्याप सुरू नाही. एकंदर बेळगाव येथून ट्रू जेटच्या सर्व सेवा तुर्तास रद्द आहेत.