बेळगाव लाईव्ह : अमेरिकेच्या धर्तीवर भारतातील वाहतूक व्यवस्था तसेच रस्ते विकसित करण्याचे स्वप्न भारताचे परिवहन अंडी रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी पहात आहेत. मात्र त्यांची हि स्वप्ने सत्यात उतरण्याची शक्यता कमी दिसत आहे.
अनेक महामार्ग सध्या असुविधेच्या विळख्यात अडकले असून बेळगावमधील पुणे – बेंगळूर महामार्गावर काकती – होनगा नजीक असलेल्या स्वच्छता गृहांची अस्वथा अत्यंत बिकट बनली आहे.
सदर महामार्गावर असणाऱ्या स्वच्छता गृहात कोणत्याही सुविधा नसून हे स्वच्छतागृह मद्यपींचा अड्डा बनले आहे. पाण्याचे तुटलेले नळ, स्वच्छतागृहाच्या फुटलेल्या काचा, दरवाजाला नसलेले कडी कोयंडे, सिमेंटच्या टाकीची झालेली दुरवस्था, पाण्याची अनुपलब्धता अशी बिकट अस्वथा या स्वच्छतागृहांची झाली असून स्वच्छतागृहांमध्ये दारू आणि पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे.
चारीबाजूंनी असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे रोगराई पसरण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. स्वच्छता गृहांची झालेली बिकट अवस्था यामुळे या स्वच्छता गृहांकडे कोणीही फिरकत नाहीत. याचाच फायदा घेत अनेक मद्यपी याठिकाणी तळ ठोकून असतात.
याचाच प्रत्यय येथे साचलेल्या बाटल्यांच्या ढिगावरून आपल्याला येतो. महामार्गावरून येणा-या, जाणा-या वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी ते उभारण्यात आलेल्या स्वच्छता गृहांची झालेली दुरवस्था याकडे महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या कंत्राटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. या स्वच्छता गृहांची तातडीने स्वच्छता करून प्रवाशांना स्वच्छतागृहांची सोय करून देणे आवश्यक आहे.