बेळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्ये आहेत त्या तीन विद्यार्थ्यांना सुखरूप परत बेळगावला आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
चिकोडीची विद्यार्थ्यांनी बेळगावला परतली त्यावेळी विमानतळावर स्वागतासाठी गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना सुरक्षित वापस आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे असे सांगत त्यांनी एकूण बेळगाव जिल्ह्यातील 20 विध्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते त्यापैकी 9 जण सुखरूप बेळगावला पोचले आहेत त्यापैकी दोघे बंगळुरुत आहेत 7 जण दिल्लीत पोहोचले आहेत आणि बेळगाव कडे परत येताहेत असे सांगितले
आणखी तीन विद्यार्थी अद्याप युक्रेन मध्ये आहेत त्यांना सुरक्षित वापस आणण्यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.
मयत विध्यार्थ्यांचे पार्थिव आणण्यासाठी प्रयत्न
युक्रेन मध्ये मयत झालेला विद्यार्थी नविनचा मृतदेह कुठेही गेलेला नाही सध्या युद्ध सुरू आहे.मुख्यमंत्र्यांनी मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे असे मत अन्न नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी यावेळी व्यक्त केले.