Thursday, December 26, 2024

/

अर्थसंकल्पात बेळगावसाठी कोणत्या तरतुदी आहेत?

 belgaum

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आपल्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला असून राज्याच्या विकासासाठी कोविडसारख्या बिकट परिस्थितीतदेखील राज्याच्या आर्थिक विकासासाठी योगदान देण्याचा मानस ठेवला आहे. अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देवस्थानाला भेट देऊन त्यानंतर विधानसौधमध्ये २०२२-२३ या साचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

यामध्ये बेळगावसाठी तीन महत्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या असून प्रामुख्याने किडवाई कँसर सेंटर, बहुमजली वसतिगृह आणि नव्या कृषी महाविद्यालयाच्या घोषणेचा समावेश आहे. याचप्रमाणे अर्थसंकल्पात मराठा समाजाच्या विकासासाठी पुन्हा ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वेळी ५० कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली होती. तसेच मराठा विकास प्राधिकरण स्थापनेचीही घोषणा केली होती. यानंतर राज्यभरात यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि हि घोषणा हवेतच विरली. यंदाही अशाचप्रकारे मराठा समाजाच्या विकासासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली असून बोम्मई सरकार मराठा समाजाचा खरोखर विकास करणार आहे कि केवळ तरतुदी करणार आहे असा सवाल देखील उपस्थित होत आहे.Bommai

अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी –

– रोजगार, शिक्षण आणि सक्षमीकरण या तीन मूल्यांवर अधिक भर
– कृषी आणि सिंचनावर अधिक भर देत मेकेदाटू प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद
– बेंगळूर शहरात दिल्लीतील ‘दिल्ली मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर होणार ‘अवर क्लिनिक्स’
– एकूण ४३८ रुग्णालयांची दिल्ली मॉडेलप्रमाणे होणार बेंगळूरमध्ये स्थापना
– राज्यातील गोशाळांची संख्या ५१ पासून १०० पर्यंत वाढविणार
– राज्यातील गोशाळांची संख्या वाढविण्यासाठी ५० कोटींची तरतूद
– २००० जनावरांचे शेतकऱ्यांना होणार वितरण
– गोमाता सहकारी संघ स्थापनेची घोषणा
– मराठा समाज विकासासाठी ४० कोटींची तरतूद
– विधवा वेतन योजनेंतर्गत महिला अनुदानात वाढ तसेच लैंगिक अल्पसंख्याकांसाठी मासिक पेन्शन मध्ये ८०० कोटींची वाढ
– ऍसिड हल्ल्यातील महिला पेन्शनमध्ये ३००० पासून १०००० रुपयांची वाढ
– राज्यभरात १०० नवी प्रसूती रुग्णालये स्थापन होणार
– सर्वसामान्यांवर कोणताही अतिरिक्त कर लादणार नाही
– पेट्रोल किंवा डिझेलवरील विक्रीकर वाढवणार नाही

बेळगावसाठी कोणती विशेष तरतूद?

– बेळगावमध्ये स्थापन होणार किडवाई रिजनल कँसर सेंटर. कँसर सेंटर साठी ५० कोटींची तरतूद
– बेळगावमध्ये उभारले जाणार १००० क्षमतेचे बहुमजली वसतिगृह
– अथणी तालुक्यात नव्या कृषी महाविद्यालयाची स्थापना होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.