1,604 एकरमध्ये विस्तारले आहे बेळगाव कॅंटोनमेंट
सरकारने देशभरातील कॅन्टोन्मेंट हद्दी बाहेर विस्तारलेल्या लष्करी जमिनीचे सर्वेक्षण
करण्याबरोबरच 62 कॅंटोनमेंट हद्दींचे सीमांकन केले आहे.
ताब्यात असलेल्या जमिनींच्या बाबतीत बेळगाव कॅंटोनमेंट 1,604.68 एकर जमिनीसह संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या 62 कॅंटोनमेंट्सच्या यादीत 29 व्या स्थानावर आहे.
दिल्ली कॅंटोनमेंट सर्वाधिक 8666.58 एकर जमिनीसह अग्रस्थानी असून अल्मोरा कन्टोनमेंटच्या ताब्यात सर्वात कमी म्हणजे 156.25 एकर जमीन आहे.
कॅन्टोन्मेंटच्या या जमिनींचा वापर संरक्षण दलाच्या भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी केला जाणार आहे. रक्षा राज्य मंत्री अजय भट्ट यांनी लेखी स्वरूपात आज शुक्रवारी पल्लब लोचन दास यांना ही माहिती दिली.