Monday, December 30, 2024

/

श्री चषक क्रिकेट : ‘या’ संघांचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय

 belgaum

श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये फॅन्को क्रिकेट क्लब, इंडियन बॉईज हिंडलगा, एसआर वॉरियर्स आणि मराठा स्पोर्ट्स ग्रामीण या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज झालेल्या पहिल्या सामन्यात फॅन्को क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्धी सरदार्स वॉरियर्स संघाला 14 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना फॅन्को क्रिकेट क्लबने मर्यादित 8 षटकात 8 गडी बाद 87 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल सरदार्स वॉरियर्स संघाला मर्यादित 8 षटकात 4 गडी बाद 73 धावाच काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी फॅन्को क्लबचा सानू कुमार हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे उत्तम शिंदे व अमर सरदेसाई यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगा संघाने प्रतिस्पर्धी अनगोळ स्ट्रायकर्स संघावर 10 गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना अनगोळ स्ट्रायकर्स संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 52 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने अवघ्या 2.4 षटकात एकही गडी न गमावता 53 धावा काढून सामना जिंकला. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी इंडियन बॉईज संघाचा तडाखेबंद फलंदाज शिवाजी पडोळकर हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे प्रशांत देवडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

तिसऱ्या सामन्यात डेपो मास्टर्स संघाला प्रतिस्पर्धी मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाकडून 7 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना डेपो मास्टर्स संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 52 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाने 5.2 षटकात 3 गडी बाद 53 धावा काढून सामना खिशात टाकला. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी मराठा स्पोर्ट्सचा संतोष सुळगे पाटील हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे शिवराज जाधव व युवराज जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.Shree trophy cricket

चौथ्या सामन्यात एसआर वॉरियर्स संघाने प्रतिस्पर्धी अतिक स्पोर्ट्स यमकनमर्डी संघाला 5 गडी राखून पराजित केले. प्रथम फलंदाजी करताना अतिक स्पोर्ट्स यमकनमर्डी संघाने मर्यादित 8 षटकात 9 गडी बाद 64 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल एसआर वॉरियर्स संघाने 5.5 षटकात 5 गडी गमावून विजयासाठी आवश्यक 66 धावा काढल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एसआरचा किरण बिडादे हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे अभिजीत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

आजच्या मंगळवारच्या शेवटच्या पाचव्या सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगा संघाने प्रतिस्पर्धी फॅन्को क्रिकेट क्लब संघावर 10 गडी राखून सहज पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना फॅन्को क्रिकेट क्लबचा डाव 7.5 षटकात सर्व गडी बाद 36 धावा असा संपुष्टात आला. हे आव्हान सहज पेलताना इंडियन बॉईज हिंडलगा संघाने अवघ्या 3.1 षटकात एकही गडी न गमावता 40 धावा झळकविल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी इंडियन बॉइजचा अवधूत पाटील ठरला. त्याला प्रमुख पाहुणे यशोधन तुळसकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.