केआर शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे युनियन जिमखाना मैदानावर आयोजित दुसऱ्या केआर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे सातवे फ्रॅंचाईजी म्हणून प्रवीण कराडे हे लाभले आहेत. बीसीसी मच्छे फौजी ग्रुप या नावाने त्यांनी आपला संघ स्पर्धेत उतरविला आहे.
बीसीसी मच्छे फौजी ग्रुप या संघाने यापूर्वी बीपीएल, बीसीएल, विमल फाउंडेशन, साईराज चषक अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
बीसीसी मच्छी संघातर्फे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व संधी उपलब्ध करून देण्याचे काम संघमालक प्रवीण कराडे यांनी केले आहे.
केआर शेट्टी स्पर्धेसाठी बीसीसी मच्छे फौजी ग्रुप या नावाने हा संघ खेळणार आहे. या संघात प्रवीण कराडे, ज्योतिबा गिलबिले, शतक गुंजाळ, भरत गाडेकर, अमर काळे, श्रीशैल जाधव, आकाश असलकर,
व्यंकटेश शिराळकर, दीपक नार्वेकर, विशाल संभाजीचे, राहुल शिंदे, गुरुप्रसाद पोतदार, शिवप्रसाद हिरेमठ, अमेय अडकूरकर, मनोज पाटील, अलीम माडीवाले, विशाल गौरगोंडा, ऋषिकेश रजपूत, सौरभ पाटील आधी खेळाडूंचा सहभाग आहे.