मराठा समाजाला एकत्र करून कर्नाटकात होदेगेरी येथे असलेल्या शहाजी राजांच्या दुर्लक्षित समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी पुढाकार बेळगावातील सर्व मराठा समाज बांधवांनी निर्धार केला. मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. सदर बैठक मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्ती मठात आयोजित केली होती,मराठा समाजाचे स्वामी श्री श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही बेळगावातील सर्व मराठा समाजाच्या बांधवांनी दिली.
सुरुवातीला साहित्यिक गुणवंत पाटील यांनी प्रास्ताविक करताना मराठा समाजाने एकत्रित येणे का गरजेचे आहे हे सांगितले.
१) श्री श्री मंजुनाथ स्वामी आणि खासदार संभाजी राजे यांचा १५ मे रोजी सत्कार करणे, २) शहाजी राजे यांनी स्थापन केलेल्या मराठा गादीची समाजात माहिती पोहचविणे, ३) मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित पाहणे, ४) मराठा समाज औद्योगिक आणि रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करणे, ५) मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य विषयक सेवा पुरविणे, ६) मराठा समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन व मदत करणे, ७) सरकारी योजना मराठा समाजातील सर्व स्तरावर पोहचविणे, ८) मराठा समाजातील गरीब शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणे, ९) मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे वेगवेगळे विभाग करणे, १०) मराठा समाजातील महिलांसाठी गृहउद्योग निर्माण करणे.
या मुद्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले.
किरण जाधव यांनी आपले विचार मांडताना सांगितले की मराठा समाज एकत्र येणे काळाची गरज आहे. त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत द्यावयास तयार आहे. शिवाजी सुंठकर म्हणाले की मराठा समाज विखुरलेला आहे, पूर्व भागामध्ये आमचा समाज भरपूर आहे, त्यांची मातृभाषा कन्नड आहे पण जात मराठा आहे असे सांगितले.
रणजित चव्हाण पाटील म्हणाले की एकत्र येत असताना स्वार्थ बाजूला ठेवून कार्य करूया असे सांगितले.सुनील जाधव यांनी ही समाजाच्या कल्याणाचे बहुमोल विचार व्यक्त केले.दत्ता जाधव यांनी आर्थिक निधीची सुरुवात केली त्यांनी जत्ती मठ देवस्थानाच्या वतीने सुरुवात म्हणून ५१०००/- हजार रुपयाची घोषणा केली.
सरिता पाटील म्हणाल्या की समाज संघटीत होणे गरजेचे आहे.रेणू किल्लेकर म्हणाल्या की समाजात एकी खूप महत्त्वाचे आहे .रमेश गोरल म्हणाले की समाजाने एकत्र येणे खूप गरजेचे आहे, त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.किरण धामनेकर म्हणाले की पदाधिकारी विरहित संघटना असावी असे सांगितले.
बैठकीत बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अनिल पाटील यांनी समाजासाठी १०००/- रुपयांची देणगी जाहीर केली.शेवटी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी विभागवार बैठका करून मराठा समाजाचा सर्वच क्षेत्रात एकजुटीने विकास करूया असे सांगितले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी विचार मांडले सर्वश्री महादेव पाटील, शंकर बाबली, विनायक गुंजटकर, संजय अष्टेकर, रमेश गोरल, अरविंद पालकर, अनंत लाड, , डॉ अमित जाडे, यांनी विचार मांडले. विविध भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी युवक कार्यकर्ते सागर पाटील यांनी लवकरच कार्यालयाचे उदघाटन होईल असे सांगीतलेआणि बैठकीची सांगता झाली.