रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरा रेल्वे फाटक आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे.
रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च सायंकाळी 6 पर्यंत हे रेल्वे फाटक बंद असणार आहे.
त्यासाठी वाहन धारकांनी या रस्त्याचा वापर न करता पर्यायी रस्ता निवडावा असे आवाहन रेल्वे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
बेळगाव शहरात सध्या रेल्वे मार्गाच्या दुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी शहरातील विविध रेल्वे फाटक काही काळासाठी बंद होत आहेत मागील आठवडा भरात तानाजी गल्ली पहिले रेल्वे फाटक बंद झालं होतं त्या नंतर पहिले दुसरे रेल्वे फाटक बंद होते आता तिसरे गेट देखील तीन दिवसां साठी बंद असणार आहे.