मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा अर्थात 144 कलम लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे उद्या कर्नाटक उच्च न्यायालया मध्ये हिजाब संबंधी याचिकेवर निर्णय दिला जाणार आहे त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवार 15 मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पुढचा आदेश येईपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा आदेश बजावण्यात आलेला आहे
उद्या सकाळी सहा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत बेळगाव जिल्ह्यामध्ये चारपेक्षा अधिक जणांनी जणांना एकत्र फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये हिजाब संबंधी याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालय निर्णय देणार आहे त्या निर्णयावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावधानतेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी बेळगाव जिल्ह्यामध्ये हा जमावबंदीचा आदेश बजावले ला आहे. दरम्यान सहाय्यक प्राध्यापक परीक्षा सुरू असतील असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
जमाव बंदीच्या आदेशात याचे पालन करावे लागणार आहे
1.बेळगाव जिल्ह्यामध्ये कोणत्याही कायदेशीर बाबीचा भंग करण्याच्या उद्देशाने चार किंवा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी
2.अंतिम संस्कार,हॉटेल आणि सिनेमा थिएटर्स वगळता कोणतीही सभा, मिरवनुक काढण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.
3.शस्त्रास्त्रे किंवा स्फोटक वस्तू घेऊन फिरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे
4. जमावबंदी दरम्यान कुणीही फटाक्यांची आतषबाजी करू नये असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे
5.शासकीय किंवा खाजगी वाहने अडवू नये असेही या आदेशात म्हटले आहे