बेळगाव : कर्नाटकचे आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ नुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत बेळगाव जिल्हा पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. २०२१-२२ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार बेळगाव जिल्ह्याचा क्रमांक एकूण ३० जिल्हांमध्ये २२ वा आहे. (पीसीआय डेटा २०१९-२०) तर बेंगळूर अर्बन पहिल्या स्थानावर आहे.
२०१८-१९ च्या सर्वेक्षण अहवालानुसार ११३६०८ इतके बेळगाव जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न होते. बेळगावच्या राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पादनात ४.३ टक्के इतके योगदान दिले आहे. २०१८-१९ सालच्या सर्वेक्षणानुसार हा आकडा ४.५ टक्के इतका होता.
बेळगाव तालुकानिहाय एकूण अनुमानित लोकसंख्या २०२१ – ११३७१७७
बेळगाव जिल्हानिहाय एकूण अनुमानित लोकसंख्या २०२१ – ५४९५३६५
स्थिर (२०११-१२) किमतीनुसार, पीक क्षेत्रातील अधिक योगदानामुळे, २०१९-२० मध्ये प्राथमिक क्षेत्रातील बेळगाव जिल्ह्याचे योगदान सर्वाधिक आहे.
बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटकातील एक्सपोर्ट हब म्हणून विकसनशील जिल्ह्यांसाठी ओळखली जाणारी उत्पादने खालील प्रमाणे आहेत
गहू, सेंद्रिय गूळ, साखर, बेदाणे, लोह कास्टिंग, औद्योगिक कास्टिंग, हायड्रोलिक प्रेशर उपकरणे, पंप आणि व्हॉल्व्ह ऍक्सेसरीज,, इंजिनिअरिंग घटक, (एरोस्पेस घटक), कोल्हापुरी चप्पल, हळद, दुधावर आधारित मूल्यवर्धित उत्पादने.
जिल्हानिहाय सहकारी बँक क्रेडिट, एकूण बँक क्रेडिट आणि इतर आर्थिक चलांचा हिस्सा म्हणून १५.०९ टक्के
गरिबी दर – १६.४
२०२१-२२ सालच्या कर्नाटक अर्थसंकल्पात, राज्य सरकारने “एक जिल्हा, एक उत्पादन” धोरणाला कर्ज, उत्पादनांच्या विपणनासाठी मार्ग आणि तांत्रिक ज्ञान देऊन असंघटित सूक्ष्म-अन्न प्रक्रियेच्या संभाव्यतेचा फायदा घेण्यास मोठी योजना आखली आहे. यामध्ये प्रामुख्याने गुळासाठी अधिक महत्व देण्यात आले असून बेळगाव ओडीओपी मध्ये गुळाचा समावेश करण्यात आला आहे.
३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत २०२०-२१ वर्षासाठी नोंदणीकृत मायक्रो युनिट्स, गुंतवणूक आणि रोजगाराची संख्या खालीलप्रमाणे :-
गुंतवणुकीसह ५८५१ युनिट्स (रु. ११७.८१ कोटी) आणि ५७८८८ लोकांना रोजगार
वैयक्तिक शौचालय असलेल्या नमुना कुटुंबांचे प्रमाण बेळगाव, ६६.७ टक्के