बेळगाव महापालिकेकडून यावर्षी जवळपास साडेतीन टक्के कर वाढ असल्याची माहिती मिळताच उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ महापालिका आयुक्त रुदरेश घाळी यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना टॅक्स वाढ करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन सादर केले.
तत्पूर्वी आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि नगर विकास मंत्री बसवराज भैरत्ती यांची देखील यांच्याकडे देखीललेखी स्वरूपात मागणी केली होती आता त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन बेळगाव महापालिकेने यंदा टॅक्स वाढ करू नये अशी मागणी केली आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनाचा कहर अतिवृष्टी आणि पुरामुळे लोक अगोदरच त्रस्त आहेत त्यात उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने लोकांना भरपूर नुकसान झाले आहे आर्थिक मंदी असल्याची स्थिती आहे मागील वर्षी जो कर होता तोच कर यावर्षीही देखील लागू करावा असं अनिल बेनके यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कर वाढी संदर्भात लवकरच मी मुख्यमंत्री नगर विकास मंत्र्यांची भेट घेणार आहे त्यामुळे तुम्ही बेळगाव महापालिकेतून कोणताही आदेश पारित करू नका असेही बेनके यांनी महापालिका आयुक्त घाळी यांना सांगितले आहे.
सामान्य जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असून यावर्षीची कर वाढ रद्द करावी असेही त्यांनी म्हटले आहे.