सोशल मीडियावर मुस्लिम युगाचे खोटे अकाउंट बनवून बागलकोट च्या विधान परिषद सदस्य यांना धमकावले प्रकरणी गोकाकचा एका युवकाला जेलची हवा खायला लागली आहे.
बागलकोट पोलिसांनी सिध्दरुढ श्रीकांत निराळे वय 31 रा. शिंदी कुरबेट्ट गोकाक असे या अटक झालेल्या युवकाचे नाव आहे.सोशल मीडियावर मुस्लिम युवकाच्या नावाने खोटे अकाउंट बनवून भाजप आमदार डी एस अरुण यांना धमकी दिल्या प्रकरणी त्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिद्धरुढ हा शेतकरी आहे त्याचे कुटुंब गोकाक घटप्रभा रोडवर नर्सरी चालवते. मुश्ताक अली या नावाने त्याने फेसबुकवर खोटे प्रोफाइल बनवले होते त्या अकाऊंट वरून विधान परिषद सदस्य अरुण यांच्या कुटूंबियांना धमकी दिली जात होती. आमदार अरुण हे माजी विधान परिषद अध्यक्ष डी एच शंकरमूर्ती यांचे चिरंजीव होय.
शिमोगा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या खुना नंतर त्याने फेसबुकवर गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या नंतर आमदार अरुण यांच्या वर देखील तीव्र पोस्ट केली करत पत्नी मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
आमदार अरुण यांनी शिमोगा आणि बागलकोट येथे सायबर क्राईम पोलीस स्थानकात तक्रार केली होती पोलीस तपासात सिद्धरूढ यांना पोलिसांनी पकडून त्याच्यावर गुन्हा नोंद केला असून तपासासाठी शिमोगा पोलीस देखील ताब्यात घेणार आहेत.