बेळगाव शहरातील भवानीनगर परिसरात एका रिअल इस्टेट एजंटच्या भोसकून खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू मल्लाप्पा दोडभोम्मण्णावर वय 45 वर्षे रा. बस्तवाड (हलगा) असे या रियल इस्टेट एंजटचे नाव असून तो मूळचा बस्तवाड गावचा असून टिळकवाडी येथे काही वर्षा पासून वास्तव्यास होता.
मयत राजू याला चाकूने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये तिखट पूड टाकून त्याला भोसकण्यात आले होते या घटनेमुळे मंडोळी रोड परिसरात एकच खळबळ माजली आहे.
राजू सध्या संस्कृती पाम्स टिळकवाडी येथे राहत होता. जागेसंदर्भात काही वादा मधून हा प्रकार घडला असल्याची शक्यता असून पहाटेच्या सुमारास एक फोन कॉल करून त्याला बोलावून घेण्यात आले . त्यानंतर तो आपली स्कोडा कार घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र तासाभरातच त्याची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा केला आहे आणि नेमका खून कशासाठी झाला याचं कारण काय आहे याचा तपास सुरू आहे.