पदवीधर मतदार संघाच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदार होण्याच्या दृष्टिकोनातून पदवीधरांना अर्ज करण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
पदवीधर मतदार संघात नजीकच्या काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार होण्यासाठी पदवीधरांनी मतदार अर्ज भरायचे आहेत. मागील निवडणूकवेळी ज्यानी मतदानाचा हक्क बजावला आहे, त्यांनीही पुन्हा येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार होण्यासाठी पुन्हा मतदार अर्ज भरायचा आहे.
मतदार नांव नोंदणीसाठी दोन अर्ज आणि दोन फोटो सोबत आधार कार्ड, पदवी गुणपत्रिका ( मार्क्स कार्ड ) आणि मतदार ओळखपत्र हे सर्व नोटरी किंवा अटेस्टेड करून अर्ज भरावयाचे आहेत.
यासाठी सर्व पदवीधरांसाठी हे अर्ज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोडवरील कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी पात्र उमेदवारांनी सदर अर्जाचे झेरॉक्स काढून घेऊन आपापल्या गावांमध्ये वितरित करावेत.
सदर अर्ज भरून तहसीलदार कार्यालयात द्यायचे आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत मे महिन्याच्या अखेरपर्यंत आहे, असे तालुका म. ए. समितीने कळविले आहे.