मी पब्लिकसाठी आहे पब्लिसिटीसाठी नव्हे …असं उत्तर विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी दिलं.विधान परिषद निवडणुक जिंकताच आपण बेळगाव ग्रामीण मतदारसंघात दिसत आहात यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी बेळगाव ग्रामीण च्या आमदारांना खोचक टोमणा मारत मी पब्लिक साठी आहे पब्लिसिटीसाठी नावे असं म्हटलंय.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना लखन जारकीहोळी यांनी वरील वक्तव्य केलंय.आपले मोठे बंधू अर्थात रमेश जारकीहोळी यांना भाजपा हायकमांडचा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या दोघांचा आशीर्वाद आहे त्यामुळे त्यांचा आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा नक्कीच समावेश होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
म्हणाले पुढे म्हणाले की 17 आमदारांच्या त्यागामुळेच आज भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आहे त्यात रमेश जारकीहोळी यांचा त्या 17 आमदारां पैकी एक मुख्य आमदार आहेत. मला विश्वास आहे की भाजप पक्ष त्यांना योग्य सन्मान आणि आदर देईल.
कर्नाटक विधान परिषदेचे अपक्ष आमदार म्हणून आपण विधानपरिषदेचा सभागृहात कुणाला पाठिंबा देणार यावर बोलताना त्यांनी ज्या त्या विषयाला अनुसरून आपण पाठिंब्या बाबत ठरवणार असल्याचं म्हटलं आहे.
धर्मांतर विरोधी विधेयका विषयी मला पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही पक्षाने अद्याप संपर्क केलेला नाही. माझं मत देण्यापूर्वी मी यावर नक्कीच विचार करेन असं लखन यांनी यावेळी स्पष्ट केलं