हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी राज्यातील विविध मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी उद्या गुरुवार दि. 17 मार्च रोजी ‘कर्नाटक बंद’ पुकारला आहे.
बेळगावच्या अंजुमन इस्लाम आणि उलेमांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कर्नाटकातील मुस्लिम संघटनांनी संयुक्तरीत्या 17 मार्च रोजी पुकारलेला राज्यव्यापी बंद कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब संदर्भात जो अंतरिम निकाल दिला आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करण्यासाठी पाळण्यात येणार आहे.
इमरात -ई -शरीहा कर्नाटक, जमियात -ए -उलमा हिंद कर्नाटक, जमात -ए -इस्लामी हिंद, जमियात -ई -अली हादीस, जामात -ई -अली सुन्नत कर्नाटक, कर्नाटक मुथैदा मुस्लिम महज,
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ऑल इंडिया मिली कौन्सिल कर्नाटक अँड फॉरवर्ड ट्रस्ट या संघटनांनी कर्नाटक बंदला पाठिंबा दर्शविला आहे. अमीर -ई -शारिहा कर्नाटक मौलाना सागिर अहमद रशीद यांनी उद्या बुधवारचा ‘कर्नाटक बंद’ जाहीर केला आहे.