बेळगावच्या डेल्टासेस ई फॉर्मिंग या थ्रीडी प्रिंटिंग मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई या संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रयोगशाळेसाठी संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या काँक्रीट थ्रीडी प्रिंटर विकसित करण्यात आला आहे.
डेल्टासेस ई फॉर्मिंग ही बेळगावातील हार्डकोर मशीन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीमध्ये एफडीएम, डीएलपी हाय परफॉर्मन्स एफडीएम, एफडीएम एक्सट्रूशन टेक्नॉलॉजी, कॉम्पोझिट 3डी प्रिंटर क्ले 3डी प्रिंटर अशा सर्व प्रकारच्या थ्रीडी प्रिंटिंग मशीन तयार केल्या जातात.
आता त्यांनी काँक्रीट थ्रीडी प्रिंटरची निर्मिती केली असून जो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई यांच्याकडे रवाना करण्यात आला आहे. त्याप्रमाणे डेल्टासेस ई फॉर्मिंग कंपनी सध्या भारतातील एका बहुराष्ट्रीय बांधकाम कंपनीसाठी महाकाय काँक्रीट थ्रीडी प्रिंटरची निर्मिती करत आहे. याद्वारे चार मजली इमारती उभारता येऊ शकतात.