बंगलोर शहरात राजकीय आणि अराजकीय रॅली,मोर्चे यांच्यावर बंदी घालण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाचचे न्या.
रितुराज अवस्थी आणि न्या. एस आर कृष्णकुमार यांच्या पीठाने बजावला आहे.
शहरात मोर्चमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि जनतेला जाण्या येण्यासाठी होणारा त्रास यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.या जनहित याचिकेवर सुनावणी झाल्यावर मोर्चा आणि रॅली यांच्यावर बंदी घालण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
आंदोलन आदी केवळ फ्रीडम पार्क परिसरात करण्यात यावीत ,शहरात कोणतेही मोर्चा,रॅली काढण्यात येवू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव शहरात देखील नेहमी मोर्चे आणि आंदोलने छेडण्यात येतात.राणी कित्तुर चन्नमा चौकात आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येत असल्याने तेथे वाहतुकीची मोठी कोंडी होते आणि जनसामान्यांना जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होते.
दवाखान्यात जाणाऱ्या तसेच गावाला जाणाऱ्या,सरकारी कार्यालयात जाणाऱ्या व्यक्तींना यामुळे त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे बेळगाव शहरात देखील मोर्चा आणि आंदोलन यासाठी एखादी जागा महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने निश्चित करावी अशी मागणी होत आहे.