Tuesday, January 28, 2025

/

*रानीबेन्नूरच्या विद्यार्थ्याचा युक्रेन-रशिया युद्धात मृत्यू*

 belgaum

युक्रेन मधील खारकीव शहरांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातल्या रानीबेन्नूरच्या एका विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धाचा भडका उडाला असून या युद्धात भारत देशातला गेलेला या विद्यार्थ्यांचा पहिला बळी आहे.

हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगेरी गावचा नवीन ज्ञानगौडर शेखरप्पा वय 21 असे मयत विध्यार्थ्याचे नाव आहे.मयत हा मेडिकलचा विद्यार्थी असून तो चौथ्या सेमिस्टर मध्ये शिकत होता मंगळवारी सकाळी खायला जेवण आणायला सुपर मार्केटला घराबाहेर गेला होता त्यावेळी तो नंबरात थांबला असताना झालेल्या रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळत आहे.

युक्रेनची राजधानी कीव येथील परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिघडत असून तेथील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अ‍ॅडवायझरी भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आली आहे. भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. ज्या मिळेल त्या माध्यमातून कीव शहर सोडण्याचं आवाहन भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरीकांना करण्यात आलं आहे. भारतीय दूतावासानं जारी केलेल्या याच अ‍ॅडवायझरीवरुन तेथील परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकेल.Ukrain

 belgaum

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार खारकिव मध्ये आज मंगळवारी सकाळी झालेल्या रशियन सैन्याच्या हल्ल्यात कर्नाटकात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

युक्रेन-रशिया युद्ध लवकरात लवकर समाप्त कसं होईल,दोन्ही देशात शांतता कशी प्रस्थापित होईल.याकडे जगाने बघायला पाहिजे,प्रयत्न करायला हवा,मात्र तसं न करता आगीत तेल ओतण्याचे काम अमेरिका आणि युरोपकडून सुरु आहे.हे देश युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवताहेत,याने युद्ध अधिक भडकणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.