Sunday, November 17, 2024

/

‘या’ कंपनीकडून फ्लोट ग्लास प्रकल्पाची उभारणी

 belgaum

गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेड या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या फ्लोट ग्लास (फ्लोट काच) उत्पादक कंपनीने स्वदेशी बनावटीच्या फ्लोट ग्लासची वाढती मागणी लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठा फ्लोट ग्लास प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. बेळगावच्या कणगला औद्योगिक परिसरातील सुमारे 200 एकर विस्तीर्ण जमिनीमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

या नव्या ग्रीनफिल्ड प्रकल्पाअंतर्गत प्रतिदिन 800 टन उत्पादन क्षमतेच्या दोन फ्लोट लाइन्स आणि प्रतिदिन 300 टन उत्पादन क्षमतेच्या एका सोलार ग्लास लाईनचा समावेश असणार आहे. उपरोक्त फ्लोट लाईन पैकी प्रतिदिन 800 टन उत्पादनाची फ्लोट लाईन 2023 सालच्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहा महिन्याच्या अंतराने उर्वरित 300 टनाची सोलार ग्लास आणि 800 टनाची फ्लोट ग्लास या दोन लाइन्स कार्यान्वित होणार आहेत.

गोल्ड प्लस क्लास इंडस्ट्री लिमिटेडच्या या फ्लॉट ग्लास प्रकल्पामुळे देशातील स्वदेशी प्लॉट ग्लासच्या मागणीची बर्‍याचशा प्रमाणात पूर्तता होण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पातील एक फ्लोट लाईन ही देशातील पहिली अशी फ्लोट लाईन आहे की जी 15 आणि 19 मि. मी. जाडीच्या काचेची निर्मिती करणार आहे.

Gold plus

त्याचप्रमाणे एकाच ठिकाणी असलेल्या दोन फ्लोट लाइनद्वारे ग्राहकांना स्पष्ट आणि रंगछटा असणारी काच उपलब्ध केली जाणार आहे. फोटो व्होल्टिक पॅनलमधील विज निर्मितीसाठी वापरले जाणारे पर्यावरण पूरक सोलार ग्लास प्रभात सौर काच उत्पादन केंद्र उभारण्याचीही गोल्ड प्लस कंपनीची योजना आहे.

कर्नाटक सरकारचे प्रोत्साहन आणि जलद मान्यता यामुळे बेळगावचा विकसनशील औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यास सक्षम आहे. राज्यात सौर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने जो पुढाकार घेतला आहे त्यासाठी बेळगाव येथील सोलार ग्लास निर्मिती केंद्र हे प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रेमजी इन्व्हेस्टचे भागीदार राजेश रामय्या यांनी सांगितले.

दरम्यान कोटक गुंतवणूक सल्लागारांकडून चालविल्या जाणाऱ्या कोटक स्पेशल सिच्युएशन्स फंडने (केएसएसएफ) मंगळवारी गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेडमध्ये 450 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.