उडान -3 योजनेअंतर्गत गेल्या 25 जानेवारी 2019 रोजी बेळगाव शहरासाठी 13 हवाईमार्ग मंजूर करण्यात आले जे इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक असून यापैकी जयपुर वगळता 12 मार्ग पर्यायी मार्ग आहेत. यामुळे बेळगाव शहर देशातील 15 शहरांना थेट जोडले गेले असून यापैकी 12 शहरांना नॉन स्टॉप विमान सेवा आणि 3 शहरांना जोड विमानसेवा (कंनेक्टींग फ्लाइट्स) आहे.
कंपनीच्या अंतर्गत कारणास्तव ट्रू जेट विमान सेवा तुर्तास रद्द आहे. बेळगाव विमान तळावरून असणाऱ्या नॉन स्टॉप विमानसेवा पुढील प्रमाणे आहेत. 1) बेंगलोर -बेळगाव, 2) बेळगाव -दिल्ली, 3) बेळगाव -मुंबई (2), 4) बेळगाव -हैदराबाद (2), 5) बेळगाव -अहमदाबाद, 6) बेळगाव -सुरत, 7) बेळगाव -पुणे, 8) बेळगाव -नागपूर (16 एप्रिल), 9) बेळगाव -जोधपुर, 10) बेळगाव -नाशिक, 11) बेळगाव -इंदोर आणि 12) बेळगाव -तिरुपती. एक थांबा असणारी कनेक्टिंग विमानसेवा पुढील प्रमाणे आहेत. 1) बेळगाव -कलबुर्गी (व्हाया तिरुपती), 2) बेळगाव -किशनगड (व्हाया सुरत), 3) बेळगाव -नाशिक (व्हाया पुणे).
उडान मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. 1) बेळगाव ते हैदराबाद -इंटर ग्लोबल (इंडिगो) स्पाइस जेट टर्बो मेगा (ट्रू जेट), 2) बेळगाव ते मुंबई – स्पाइस जेट, घोडावत (स्टार एअर), 3) बेळगाव ते पुणे -अलायन्स, 4) बेळगाव ते सुरत -घोडावत (स्टार एअर), 5) बेळगाव ते कडप्पा -टर्बो मेगा (ट्रू जेट) तूर्तास सेवा रद्द, 6) बेळगाव ते म्हैसूर -टर्बो मेगा (ट्रू जेट) तूर्तास सेवा रद्द, 7) बेळगाव ते इंदोर -घोडावत (स्टार एअर), 8) बेळगाव ते जोधपुर -घोडावत (स्टार एअर), 9) बेळगाव ते अहमदाबाद -घोडावत (स्टार एअर), 10) बेळगाव ते ओझर (नाशिक) -घोडावत (स्टार एअर), 11) बेळगाव ते तिरुपती -घोडावत (स्टार एअर), टर्बो मेगा (ट्रू जेट), 12) बेळगाव ते नागपूर -घोडावत (स्टार एअर) गेल्या 16 एप्रिल 2022 रोजी घोषणा, 13) बेळगाव ते जयपुर घोडावत (स्टार एअर) अद्याप सुरू नाही.
सध्या ट्रू जेटच्या सर्व सेवा बंद आहेत. बेळगाव विमानतळ बचाव मोहिमेनंतर सध्या या विमानतळाने 15 शहरांना जोडले जाण्याबरोबर आश्चर्यकारक उत्कर्ष साधला आहे. आता दिल्ली येथील विमानसेवा येत्या 27 मार्चपासून सुरू झाल्यानंतर 16 एप्रिल रोजी नव्या बेळगाव नागपुर विमान सेवेला प्रारंभ होणार आहे.
त्यामुळे बेळगाव विमानतळावरील विमान वाहतुकीला आणखी चांगली चालना मिळणार आहे. एकंदर या पद्धतीने बेळगाव विमानतळाचा उत्कर्ष साधण्यात विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज विमान कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोचविण्याची त्यांची हातोटी अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. ज्यामुळे बेळगाव सारख्या शहरातील नागरिकांना देशातील प्रमुख शहरांची विमानसेवा उपलब्ध होऊ शकली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.