कोणत्याही जाती धर्माच्या महिला असल्या तरी त्या डोक्यावर पदर घेतात.डोक्यावर पदर घेणे ही परंपरा आहे.ब्राह्मण,लिंगायत,जैन कोणत्याही धर्माची महिला असो ती डोक्यावर पदर घेते.डोक्यावर पदर घेणे ही आपली संस्कृती आहे.असे असताना निष्कारण हिजाब वरून राजकारण केले जात आहे हे चुकीचे आहे असे मत काँग्रेस नेते सी एम इब्राहिम यांनी किल्ला येथील दर्ग्याला भेट दिल्यावेळी मत व्यक्त केले.
बेळगाव की किल्ला येथील हजरत बद्रोद्दिन बाबा दर्ग्याला गुरुवारी सीएम इब्राहिम यांनी भेट दिली त्या वेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.भाजपने हुबळी मध्ये इदगा वाद काढला, मुधोळ आणि गुलबर्गा येथेही असेच केले.आम्ही या सगळ्या बाबीवर तोडगा काढला यावर ही काढू असे ते म्हणाले.
एअर इंडिया विकू नका असे आमचे म्हणणे होते.पण मोदी सरकारने एअर इंडिया विकली.एअर इंडिया जर विकली नसती तर एकाच वेळी पंधरा विमाने युक्रेन ला पाठवता आली असती.
मी विमान उड्डाण मंत्री होतो त्यावेळीं पासून परदेशात कोणी मृत झाले तर एअर इंडिया विमानाने मृतदेह आणि दोन व्यक्तींना भारतात आणण्याची व्यवस्था होती पण आता एअर इंडिया विकल्यामुळे तसे आता करता येत नाही असेही त्यांनी नमूद केलं.
तीन महिन्यापूर्वी युद्ध होणार हे माहिती असताना देखील केंद्र सरकार जागृत नव्हते अशीही टीका त्यांनी करीत उरलेली दोन वर्षे तरी मोदी सरकारने जनतेचे हित ध्यानात घेवून सरकार चालवावे.देव त्यांना सुबुद्धी देवो एव्हढेच मी म्हणतो असे काँग्रेस नेते सी एम इब्राहिम यांनी म्हटले.