बेळगावात सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत इको फ्रेंडली पद्धतीने अंतिम संस्कार करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सुरेंद्र अनगोळकर समाजसेवा फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे.
सोमवारी मनपाचे आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांनां निवेदन देत मागणी केली आहे.सदाशिव नगर आणि शहापूर हिंदू स्मशानभूमी बेळगाव येथे आमच्या पायलट प्रोजेक्टला परवानगी देण्याची संधी द्यावी पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट उपयोगी ठरणार आहे.
अंतिम संस्कार करण्यास लाकडांऐवजी शेणाच्या पोळी/लगांचा वापर करून अंत्यसंस्कार/प्रेत. शेणखताचा वापर केल्याने इंधनाचा वापर कमी होईल आणि निसर्गाने मानवजातीला दिलेल्या झाडांचेही जतन होईल. यामुळे जंगलतोड आणि ग्लोबल वॉर्मिंगही कमी होईल आणि शेण विकून दूधवाल्यालाही जास्तीचे उत्पन्न मिळेल असे निवेदनात म्हटले आहे.
शेणाच्या पोळीचा वापर करुन अंतिम संस्कार केल्यास याचा पर्यावरणाला होणार आहे या प्रोजेक्ट साठी कुणालाही शेण पोळी दान किंवा विक्री करायची असल्यास संपर्क साधावा असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी केलं आहे.